मतिमंद निवासी विद्यालय, गेवराई
मतिमंद निवासी विद्यालय, गेवराई
रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महांडूळा संचलित मतिमंद निवासी विद्यालय, गेवराई या शाळेची गेवराई येथे सन 2014 पासून शासनाच्या परवानगीने मतिमंद मुलांसाठी निवासी विशेष शाळा सुरु करण्यात आली असून शाळेत विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश देवून शिक्षण, भोजन तसेच निवासाची सोय उपलब्ध आहे.
संस्थेचे अध्यक्ष लहू भगवानराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मुलांच्या शैक्षणिक विकासास मोठे सहाय्य केले जाते. विशेष मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून या मुलांना संस्कारमय शिक्षण देवून त्यांना स्वावलंबी बनविणे व त्यांचे पुनर्वसन करणे. दिव्यांग व्यक्तींच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थाकडे पाहून त्यांच्यातील सुप्त गुण विकसीत करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करणे हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
विशेष शिक्षण : दिव्यांग मुलांना अतितीव्र अपंगत्वामुळे सर्वसामान्य मुलांबरोबर शिक्षण घेता येत नाही. आमच्या शाळेच्या माध्यमातून विशेष गरजा असणाया मुलांना विशेष शिक्षण दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या बौध्दीक क्षमतेनुसार विशेष शिक्षणाद्वारे शिक्षण दिले जाते. मानसोपचार तज्ञ, थेरपीस्ट यांच्या माध्यमातून मुलांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपचार हयातून शारीरिक व मानसिक विकास केला जातो. तसेच दररोज योग, प्राणायाम, ध्यानधारणा, व्यायाम करून घेतले जातात व सण उत्सव, कलाक्रिडा यामध्ये सहभागी करून घेतले जाते.
आरोग्य : मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना उत्तम पोषण आहार व जीवनसत्वयुक्त पदार्थ दिले जातात . मुलांच्या वैयक्तीक स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. मुलांच्या आरोग्या विषयी पालकांना मार्गदर्शन केले जाते. अपंगत्व येवू नये यासाठी अपंगत्व प्रतिबंधात्मक जनजागॄती कार्यक्रम शाळेच्या मार्फत राबविले जातात. मुलांची नियमीतपणे वैद्यकीय तपासणी केली जाते.
आम्ही विशेष मुलांना समान शिक्षणाच्या संधी देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास कटिबद्ध आहोत.
शिक्षण, थेरपी आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला आत्मनिर्भर बनविणे हे आमचे ध्येय आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेम, समज आणि पाठिंबा देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आमच्या संस्थेतील शिक्षक, थेरपिस्ट आणि सेवाभावी कर्मचारी विशेष मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. आमच्या संयुक्त प्रयत्नांमधून एक समावेशक आणि सक्षम समाज निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.
मतिमंद निवासी विद्यालय, गेवराई जि.बीड येथे मतिमंद प्रवर्गातील मान्य 50 निवासी विशेष विद्यार्थी सर्व सोयी सुविधांचा लाभ घेत आहेत. त्यासाठी वरिल नमुद वयोगटातील दिव्यांगाच्या मतिमंद प्रवर्गातील विद्यार्थी आपणास अढळून आल्यास त्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक प्रगतीसाठी आपणास विनंती करण्यात येते की,आमच्या शाळेशी संपर्क करुन मुलांसोबत एक जिव्हाळ्याचे नाते जुळवू शकता व दिव्यांग विद्यार्थ्यांना बौद्धिक व शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लावून आमच्या संस्थेशी संपर्क करु शकता...